Posts

Showing posts from April, 2020
Image
आठ वर्षापूर्वी म्हणजेच दिनांक १६ एप्रिल २०१२ रोजी माझी सरकारी आस्थापनेवर श्री.शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय,नांदेड येथे पुरुष अधिपरीचारक ह्या पदावर नेमणूक झाली. या आठ वर्षाच्या रुग्णालयीन रुग्णसेवेचा माझ्या आणि तीच रुग्णसेवा देत असतांना माझ्या इतर परिचर्या सेवेतील बंधू आणि भगिनींच्या आयुष्याचा लेखाजोखा मी माझ्या लेखनकुवतीनुसार तुम्हांपुढे सादर करतोय. फेब्रुवारी २००६ मध्ये उच्च माध्यमिक प्रमाणपत्र परीक्षा दिल्यावर पुढे मी कोणत्या शाखेची वाट धरावी ह्याची चर्चा तेव्हा आमच्या घरात होत होती. वडिलांना गावी कुणीतरी आपल्याच समाजाचा ह्यांचा ह्यांचा मुलगा मुबंई येथील जे जे रुग्णालयात परिचर्या प्रशिक्षणाचे शिक्षण घेऊन सरकारी नौकरीस लागल्याची माहिती दिली. वडिलांनी त्या संबंधित व्यक्तीची व परिचर्या प्रशिक्षणाची पुरेपूर माहिती काढली आणि माझी मुबंई येथे जाण्याची तयारी सुरू झाली. फेब्रुवारीमध्ये झालेल्या बोर्डाच्या परीक्षेचे निकाल हाती येऊन दोन महिने होऊन गेले होते तरी जे जे रुग्णालयातील परिचर्या प्रशिक्षणबाबतची कुठलीच जाहिरात वृत्तपत्रात येत नव्हती. त्या वर्षीचे प्रशिक्ष...