साकव
नमस्कार लोकहो,सज्जनहो....मी बोलतोय....मी कोण....मी तोच ज्याच्या पाठीवरून आणि पोटावरून तुम्ही अलिकडून पलीकडे जात होतात. मी कितींदा तरी कुरकुर केली तरी माझ्याकडे कानाडोळा करून तुम्ही तुमच्याच विश्वातील घाई गर्दीत पळत होतात. एकदा किमान एकदा तरी तुमच्या पळापळीतील एका क्षणासाठी माझी अवस्था ऐकून घेतली असती ना तर काल परवा घडलेला प्रसंग टाळता आला असता. आज मीच नाही पडलोय तर तुमच्यातील हो तुम्हांसगळ्यातील एक "दुवा" साधणारा पूल पडलाय. तुम्हांपैकी प्रत्येकाच्या कानी माझ्या करूण अवस्थेतील आरोळ्या पोहचल्या होत्या पण तुमच्या इतका स्वार्थी प्राणी माझ्यातरी पाहण्यात नाही. मला निर्माण करणारा, त्या निर्मिती करण्यासाठी कुणा बिल्डर ला काम देणारा आणि माझ्या निर्मिती कार्यातून पैशारूपी मलई खाणाऱ्या बऱ्याच जणांचे चेहरे आजही मला आठवतात आणि त्यांना मी स्वार्थी,अप्पलपोटी या वर्गात बसवतो. त्यांच्या सोबत तुम्हांस ही. हो....का.....का तुम्हांपैकी कुणी माझ्या अवस्थेकडे लक्ष केंद्रित केले नाही. ...