आठ वर्षापूर्वी म्हणजेच दिनांक १६ एप्रिल २०१२ रोजी माझी सरकारी आस्थापनेवर श्री.शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय,नांदेड येथे पुरुष अधिपरीचारक ह्या पदावर नेमणूक झाली.
या आठ वर्षाच्या रुग्णालयीन रुग्णसेवेचा माझ्या आणि तीच रुग्णसेवा देत असतांना माझ्या इतर परिचर्या सेवेतील बंधू आणि भगिनींच्या आयुष्याचा लेखाजोखा मी माझ्या लेखनकुवतीनुसार तुम्हांपुढे सादर करतोय.
फेब्रुवारी २००६ मध्ये उच्च माध्यमिक प्रमाणपत्र परीक्षा दिल्यावर पुढे मी कोणत्या शाखेची वाट धरावी ह्याची चर्चा तेव्हा आमच्या घरात होत होती. वडिलांना गावी कुणीतरी आपल्याच समाजाचा ह्यांचा ह्यांचा मुलगा मुबंई येथील जे जे रुग्णालयात परिचर्या प्रशिक्षणाचे शिक्षण घेऊन सरकारी नौकरीस लागल्याची माहिती दिली. वडिलांनी त्या संबंधित व्यक्तीची व परिचर्या प्रशिक्षणाची पुरेपूर माहिती काढली आणि माझी मुबंई येथे जाण्याची तयारी सुरू झाली.
फेब्रुवारीमध्ये झालेल्या बोर्डाच्या परीक्षेचे निकाल हाती येऊन दोन महिने होऊन गेले होते तरी जे जे रुग्णालयातील परिचर्या प्रशिक्षणबाबतची कुठलीच जाहिरात वृत्तपत्रात येत नव्हती. त्या वर्षीचे प्रशिक्षण कुठल्याश्या शासकीय अडचणींमुळे तब्बल दोन ते अडीच महिने उशिराने सुरू झाले. दरम्यानच्या काळात तेव्हा डिप्लोमा ऑफ एज्युकेशन अर्थात डि.एड चे वारे जोमाने वाहत होते. आणि इकडे परिचर्या प्रशिक्षणाची जाहिरात ही येत नव्हती म्हणून परत एकदा घरात माझ्या पुढील प्रवासबाबत चर्चा घडू लागली.
जाहिरातीची वाट बघण्यात वेळ वाया घालवून वर्षच वाया जाऊ नये म्हणून मी डि. एड ला प्रवेश घ्यावा ह्यावर घरात शिक्कामोर्तब झाले. तालुक्याच्या ठिकाणच्या विद्यालयात त्याप्रमाणे प्रवेश ही घेण्यात आला पण त्याच दरम्यान त्या मुंबईस्थित वडिलांच्या ओळखीच्या सद्गृहस्थांचा म्हणजेच माझी जीवननौका ज्यांच्या परम उपकाराने पैलतीर गाठेल असे श्री.विलासदादा घरटे ह्यांचा फोन आला की परिचर्या प्रशिक्षणाचे निवेदन पत्र मिळू लागले असून मी स्वतः तुमच्या मुलांच्या फॉर्म ची फी व फॉर्म दोन्ही भरले आहेत. तुम्हांला फक्त त्याला मुलाखतीसाठी सर्व तयारीनिशी मुंबईत घेऊन येणे आहे.
तो कदाचित सप्टेंबर चा महिना असावा. मी आणि वडील दोन्ही ही मुबंई येथील सर ज. जी समूह रुग्णालयाच्या आवारात सकाळी सात वाजता पोहचलो. माझ्या शालेय कागदपत्रांची तपासणी झाल्यावर माझी मुलाखत घेण्यात आली. तेव्हा आमची प्रशिक्षणार्थीची बॅच पन्नास जणांची होती. त्यात मुलींचे ठाणे व कोकण ह्या विभागातून व आम्हां मुलांचे सर्व महाराष्ट्रातुन निवेदनपत्र मागविण्यात आले होते. त्यात एकोणपन्नास मुली आणि एक मुलगा अशी पन्नास प्रशिक्षणार्थीची ती बॅच होती. माझ्या सोबत इतर तीन जणांनी निवेदन भरले होते आणि तेही मुलाखतीस हजर होते. पण मला बारावीला त्या तिघांपेक्षा जास्त गुण असल्याने माझी त्या पुढील तीन साडेतीन वर्षाच्या परिचर्या प्रशिक्षणासाठी निवड करण्यात आली.
नंदुरबारसारख्या आदिवासी मागास जिल्ह्यात शालेयशिक्षण घेत असलेला आणि आयुष्यात कधीच मुबंई सारख्या महानगराचे स्वप्नांतही दर्शन न घेतलेल्या मला वडिलांचा त्या गावी ते मुबंई अश्या प्रवासात आणि मुलाखत होई पर्यंतच्या वेळेत सहवास लाभला. मुलाखतीनंतर माझी व्यवस्था करून वडील त्याच दिवशी सकाळी अकरा बारा वाजता मला त्या मायानगरीतील रुग्णालयीन महासागराच्या आवारात एकट्यास सोडून गावी परतले.
घरातील वातावरणाची आणि कुटुंबातील सदस्यांची आठवण येऊन मी सुरुवातीच्या रात्री आणि दिवससुद्धा रडत रडत काढले. मुबंईत पूर्वी कधीही न आलेला मी आणि त्यातल्या त्यात सोबत कुणीच पुरुष प्रशिक्षणार्थी नसल्याने मला त्यांचे दडपण येऊ लागे. असेच पहिले वर्ष रडतकुडत काढून पुढचेही दोन अडीच वर्षं मी काढले आणि माझ्या परिचर्या प्रशिक्षणाचे तीन साडेतीन वर्ष पूर्ण केले. त्या काळात मला मोलाची आर्थिक आणि भावनिक साथ दिली ती श्री. विलास घरटे आणि माझा सिनिअर घनश्याम अहेर दोन्ही ही सुहृदयांनी.
२०१०-११ ला परिचर्या प्रशिक्षण पूर्ण झाल्यावर मी वैद्यकीय शिक्षण व संचालनालयाची परिचर्या परीक्षा दिली आणि २०१२ ला मी शासकीय सेवेत अधिपरीचारक ह्यापदावर रुजू झालो. नांदेड चे दोन वर्षे आणि त्यानंतर वैवाहिक जीवनात पदार्पण केल्यानंतरचे धुळे येथील सेवेचे सहा वर्ष अशी एकूण माझ्या शासकीय सेवेला आज रोजी आठ वर्षे पूर्ण झाली.
ह्या शासकीय परिचर्या सेवेत बरेच चांगले आणि वाईटही अनुभवांचा सामना मला करावा लागला. तसा तो प्रत्येक सेवेकरीच्या आयुष्यात करावाच लागतो.
जेव्हा रुग्णालयात मी एक नर्स म्हणून काम करतोय असे सामान्यांना समजले तेव्हा त्यांच्या त्यांच्या कुवतीनुसार आणि माहितीनुसार त्यांना मी वार्डबॉय असावा किंवा डॉक्टरांच्या हाताखाली कंपाऊंडर असावा अशी माझी त्यांना ओळख झाली असावी. मला तर वाटतं माझ्या सारख्या साऱ्याच पुरुष अधिपरीचारकांची सुरुवातीला ओळख ही अशीच होत असावी.आणि तेथून ती काका, मामा, भाऊ, दादा, सर मग कळलंच तर "ब्रदर" अशी होत असावी.बऱ्याच जणांनी मला सांगितले होते की का जातोय तिकडे लोकांच्या जखमा साफ करायला त्यावेळी माझ्याकडे त्यांना द्यायला उत्तर नव्हते पण आज ह्या जागतिक संकटाच्या काळात त्यांना ह्या काळानेच उत्तर दिले असेल असे किमान मला तरी वाटते.
आपला मानवसमाज हा परस्परांवर अवलंबून आहे. जसे देशाच्या सीमेवर स्वतःच्या परिवारास सोडून आपल्या जीविताची पर्वा न करता देशाचा सैनिक आपल्या मातृभूमीचे संरक्षण करतो आहे म्हणून आपण सगळे गुण्यागोविंदाने आपले सण उत्सव साजरे करत आलो आहोत. त्याचप्रमाणे शेतकरी त्याच्या घामाने शेती पिकवतो म्हणून आपण दिवसाला दोन वेळेच रुचकर आणि स्वादिष्ट अन्न सेवन करतोय. विश्वातील,देशातील व आपल्या आसपासचे आपल्याला सारे सामाजिक, आर्थिक, कौटुंबिक व राजकीय कारभार नीट समजावेत एक समजदार आणि हुशार व्यक्ती म्हणून समाजाला आपली ओळख व्हावी म्हणून आपल्या खेड्यापाड्यातील गावागावात ज्ञानदानाचे कार्य करणारे शिक्षक आहेत. तसेच देशभरातील राज्यराज्यात आणि जिल्हा तालुक्यात सुव्यवस्था व सुरक्षा टिकून राहावी म्हणून उन्हातान्हात कडक सुरक्षा देणारे पोलीस दलातील कर्मचारी आहेत.
त्याचप्रमाणे कुटुंबियांची आरोग्याची काळजी घेत असतांना इतर दुखीतांची काळजी घेऊन सेवेकऱ्याचं व्रत अंगिकरून रुग्णसेवा करणारी परिचरिकाही आपल्या मानव समाजाचा एक मूलभूत घटकच आहे. येणारा प्रत्येक रुग्ण चेहऱ्यावर वेदनेची छटा घेऊन आपली दुःख सांगत असतांना त्याला त्याच्या वेदना जाणून घेऊन त्याच्याच घरातील एक व्यक्ती होऊन कर्तव्यावर असतांना रुग्णाचा प्रत्येक शब्दोंशब्द ऐकून घेणारी आणि त्याच्या दुखीत वेदनेवर मायेने फुंकर घालणारी ही नर्सचं असते. रुग्णालयातील दूषित वातावरणात आठ आठ दहा दहा तास काम करून पुन्हा घरचांची काळजी वाहण्याचे कामही तिलाच पार करावे लागते. त्यात प्रशासकीय वर्गातील वरिष्ठांना तोंड देणे आणि रुग्णाचीही बाजू समजून घेऊन त्यांची सेवा करणे अश्या दोन आघाड्यांनाही तिला सामोरे जावे लागते.
वरील सर्व आणि इतरही अनेक गोष्टींचा मी एक अधिपरीचारक म्हणून गेली आठ वर्षे अनुभव घेतोय. रुग्णसेवा करण्यासाठी जणू परमेश्वरानेच माझी निवड केलीय असा मला ठाम विश्वास वाटतो. ह्या सेवेची पुढील अनेक वर्षे माझ्या हातून रुग्णसेवा घडत राहो व आज साऱ्या जगतावर आलेलं हे कोरोनारूपी वैश्विक संकट लवकरात लवकर टळून जावो सारं विश्व पुन्हा एकदा त्याच्या दैनंदिन कामाला लागो हीच त्या विश्वनिर्म्यात्याचरणी प्रार्थना करतो.

Comments
Post a Comment