Posts

Showing posts from January, 2020
Image
#एक_ऋणानुबंध_बापलेक उत्तररात्रीचे व्दारपाल माघारी फिरुन गेल्यावर गरीब महालात तेव्हा झाला होता चिवचिवाट इवलेसे पाखरू आले होते घरात माझ्या ही त्याच दिवसाची कथा कहाणी आहे बाळा ज्या दिवशी माझ्यातला बाळ संपून झाला होता बाबा तुझ्यात पाहिले मी मग त्या दिवशी तुझ्या आई अन आजीचे गं बालपण आणि माझ्यातल्या पुरुषाचा झाला होता खरा सत्कार तेव्हा वाट चुकलेल्या वाटसरूस दिसू लागावी वाट क्षणभरातल्या त्या लखलखाटाने तदवतच माझ्याही नशिबी आली नवी नजर अन पाऊलवाट...जेव्हा समईरुपी तू माझ्या दारी आली झाला होता गगनात न मावणारा आनंदोउत्सव तुझ्या ग आगमनाने बाळा..... त्या दिवशी मी राजा झालो एका कोकरूचा गं मी बाळा बाप झालो..... या आनंदाच्या लहरींनवर मी कित्येक वर्षे भराऱ्या घेतल्या कित्येकदा मला धन्य झाल्यागत वाटलं तुला जपण्यात तुझे बोबडे बोल ऐकण्यात हा जन्म अपुरा असल्यागत वाटलं....तू आयुष्याच्या एकेक पायऱ्या चढत गेलीस अन मी एकेक उतरत होतो नेमका त्याच क्षणी बाळा असा एक क्षण आला तुझ्या विवाहाचा निरोप माझ्या कानी घेऊन आला त्या पिवळसर नारंगी क्षणाला मी आता रोज आठवतो सायंकाळी फाकलेल्या त्या आक...
Image
आज काल लोकांच एकमेकांशी गुफ्तगु करण्याचं प्रमाण कमी होतांना निदर्शनास येऊ लागलाय. कोळीष्टकाच्या जाळ्यात त्याची शिकार अडकावी त्याप्रमाणे मनुष्य त्याच्या रोजमराच्या व्यतिगत आयुष्यात कमालीचा गुरफटून गेलाय.सवांद समोरासमोर न होता तो व्हाट्सअप्प फेसबुकवर होऊ लागलाय. व्यक्त होण्याचं अधिकतर माध्यम चार लोकांचा घोळका न राहता मुखपुस्तकावरचा समूह होऊ लागलाय. इतकं सारं असतांनाही आपली महान संस्कृती इंग्रजी वर्षाच्या सुरुवातीलाच आपल्याला शेजारपाजाऱ्यांशी दोन गोड शब्द बोलण्याची नामी संधी बहाल करत आलेली आहे.पण आपण आहोत की त्या व्यक्तीलाच जाऊन तिळगूळ देऊन सांगतो की बाबा रे हा तिळगुळ घे पण माझ्याशी किंवा माझ्या पाठीमागे माझ्याबद्दल गोड बोल पण स्वतः जाऊन तीळ आणि गुळाचा सहारा न घेता स्वतः कधी गोड बोलला आहात का त्या व्यक्तीबद्दल दोन लोकांत त्याचे गुणगान केलं आहे का ह्याचा विचार करण्याची गरज आता मानव समाजास भेडसावू लागली आहे. तर... आपल्या महान भारतीय संस्कृतीने दिलेल्या सणानिमित्त "तिळगूळ घ्या गोडगोड बोला" ह्या एका वाक्याने एका दिवसाकरिता का असेना पण दोन सख्खे शेजारी जर गोड बोलू शकतात. तर व...
Image
ही कथा आहे एका अश्या सुकुमार गोड मुलाची ज्याला अक्षर ओळखी पासून ते लिहण्यावाचण्यापर्यंत अडचणी आहे. ज्याला आजच्या वैज्ञानिक भाषेत "डिसलेक्सिया" असं म्हणतात. तर अश्या ह्या मुलाची मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो.  "एक मुलगा होता नका विचारू कुठं. तो लिहू वाचू शकत नव्हता. बऱ्याच प्रयत्नांती त्याला काहीच आठवत नसे. की वाय एक्स च्या नंतर येतो. अक्षरं जशी त्याची त्याला दुष्मन वाटावेत. ते त्याच्या समोर नाचत नाच करून त्याचा जीव नकोसा करून त्याला त्रास देत. लिहणं वाचणं थकवत असे त्याला. दुःख आपलं तो सांगेल कुणाला. मेंदू त्याचा फुल्ल होता. स्टार्टर त्याचा गुल होता. वरून ऐ बी सी डिस्को. नापास झाला एक दिवशी बिचारा.  लिहावाचण्याच्या वजनाने मेलेला. लोकांनी त्याला ठार वेडा ठरवलं. पण मुलाने सारा अपमान मोठ्या शौर्याने सहन केला. मग एके दिवशी त्याने एक चमत्कार केला की, जी गोष्ट प्रत्येकाने ऐकली ती कानोकान पसरत गेली. सांगा सांगा सांगा कोण" माझ्या प्रमाणे तुम्हा साऱ्यांना आतापर्यंत कळलेच असेल की मी सण २००७ ला प्रदर्शित झालेल्या "तारे जमीन पर" च्या चित्रपटातील ...