"ती" रात्र अन "तो" दिवस

ति कितीतरी चमकते तारे अंगी लपेटून त्याच्या बाहुपाशात विसवण्याचा प्रयत्न करते आहे. पण जोपर्यंत पृथ्वीचे स्वतः भोवती गिरक्या मारता मारता त्या नारायणा भोवती फिरणे सुरू राहील तोपर्यंत तिला त्याच्या बाहुपाशात विसावणे शक्य नाही. जरी ती महिन्याची पहिली म्हणजे प्रतिपदेची चंद्रकोर भाळी लावून आली काय किंवा पौर्णिमेची पूर्णाकृती गोलाकार टिळा लावून अन चमचमत्या ताऱ्यांची झालर पांघरूण आली काय.
तिच्या प्रियकराच्या कोमल प्रकाशाने जागृत झालेेली सुष्टी व जसजसा नारायणरावांचा घोडदोडीचा रथ वरवर चढत जाऊन त्या घोडदोडीतल्या प्रखर उष्णतेमुळे हैरान झालेले जीव तिची अस्वस्थपणे वाट पाहू लागतील. अन शोधू लागतील मानव योनीतील नरजीव एक निरव कोपरा त्यांच्या मादीच्या बहूपाशात विसवण्याचा उन्मादक क्षण.
तिला मात्र कधीच तिच्या प्रियकराच्या समीप जाऊन एक अलवार स्पर्श करण्याचा अवसर कधीच मिळत नाही. असेही काही नाही. सुर्यनारायनाच्या अथक घोडदोडी नंतर एक क्षण मात्र येतोच. जेव्हा आदित्यराव चराचर सुष्टीचा निरोप घेऊन अस्तचला समीप क्षितिजावर विसावत असतो तेव्हा. काही क्षणांसाठी तिची अन तिची भेट होत जाते. तेव्हा कामावर निघालेली ती लाजेने किती रंगांनी नटते अन कर्तव्यदक्ष नारायण तिच्यावर चिरंतन सौभाग्याचं नारंगीलाल कुंकू तिच्या भाळी लावून निरोप घेतो.
अश्या ह्या निस्वार्थी प्रेमयुगलांचा मला नेहमी हेवा वाटतो. ती आपल्या लेकरांना गोंजारत निजवण्याच्या प्रयत्नात स्वतःच्या प्रियकराच्या शेवटच्या दर्शनाची मुग्धमधुर स्वप्नक्षण स्वतःच्या मनपटलावर जतन करण्याच्या हेतूने कर्तव्य पार पाडते तर तो त्याच्या आगमनापासून प्रस्थानांपर्यंत लाखो मानवी योनीतील नर मादींना त्यांच्या इतिकर्तव्यतेच भान देत राहतो.

✍ श्री.श्रीकांत गोविंदराव पाटील, धुळे

Comments

Popular posts from this blog

पुस्तक