प्रेमदिवस

काळ हा अविरत धावणारा जसा घोडा आहे. तसाच किंबहूना त्याहूनही दुःखासुखाचे प्रलयंकारी तडाखे देणारा कंप सुद्धा तोच आहे. काळरुपी मदाऱ्याच्या हाती मानवरुपी देह देऊन आभाळातील विश्वकर्ता आपणा सर्वांना त्याच्या इच्छे बरहुकून नाचवत राहतो अन आपण तो नाचवेल तसं नाचत राहतो. दैवगतीपुढे मनुष्यमात्राचे जाणवणारे खुजेपण, दुःख, वैफल्य, मानहानी या साऱ्या भावभावनांचा निचरा ज्याने त्याने ज्याला जसं होईल तसा करत राहणे हे महत्वाचे.
           असल्याचं एका काळाचं घोंघावणार वादळ त्याच्याही अन तिच्याही आयुष्य नावाच्या भूमीवर रोरावत निघून गेलंय. पण त्या रोरावणार्या अन घोंघावणार्या वादळाच्या तडाख्यात दोघांपैकी कुणी कधी कोलमडून पडलं नाही.
             आयुष्या नावाच्या भूमीतल्या निर्मात्याच्या बागेत दोघेही आपआपल्या समाज नावाच्या सर्वोच्च न्यायालयाने आणि समाजाच्याच साक्षीने अन आपुलकीने आपल्या जोडीदाराला सोबत घेऊन जीवनपटावर आपला नशिबी लिहला गेलेला डाव आनंदाने पुढे घेऊन जाताय.....
              अशीच तु ही जीवनप्रवासात माझ्या खांद्यास खांदा भिडवून प्रत्येक जीवन संकटास साथ देत आलीस. प्रत्येक आंनदाच्या अन सुखाच्या क्षणांत तुझा हात हाती राहो हीच इच्छा.....बायको तुला प्रेमदिवसाच्या मनःपूर्वक हार्दिक शुभेच्छा

कधीतरी एकदा माझाच मी
डोकावून पाहतो माझ्या आत
डोळे मिटून,घेतो गहिरा श्वास
उघडताच त्यांना जाणवतो,"स्पर्श तुझा"
अन हातात माझ्या असतो तुझाच हात......

✍श्री. श्रीकांत पाटील.😊

Comments

Popular posts from this blog

पुस्तक