आज काल लोकांच एकमेकांशी गुफ्तगु करण्याचं प्रमाण कमी होतांना निदर्शनास येऊ लागलाय. कोळीष्टकाच्या जाळ्यात त्याची शिकार अडकावी त्याप्रमाणे मनुष्य त्याच्या रोजमराच्या व्यतिगत आयुष्यात कमालीचा गुरफटून गेलाय.सवांद समोरासमोर न होता तो व्हाट्सअप्प फेसबुकवर होऊ लागलाय. व्यक्त होण्याचं अधिकतर माध्यम चार लोकांचा घोळका न राहता मुखपुस्तकावरचा समूह होऊ लागलाय.

इतकं सारं असतांनाही आपली महान संस्कृती इंग्रजी वर्षाच्या सुरुवातीलाच आपल्याला शेजारपाजाऱ्यांशी दोन गोड शब्द बोलण्याची नामी संधी बहाल करत आलेली आहे.पण आपण आहोत की त्या व्यक्तीलाच जाऊन तिळगूळ देऊन सांगतो की बाबा रे हा तिळगुळ घे पण माझ्याशी किंवा माझ्या पाठीमागे माझ्याबद्दल गोड बोल पण स्वतः जाऊन तीळ आणि गुळाचा सहारा न घेता स्वतः कधी गोड बोलला आहात का त्या व्यक्तीबद्दल दोन लोकांत त्याचे गुणगान केलं आहे का ह्याचा विचार करण्याची गरज आता मानव समाजास भेडसावू लागली आहे.

तर...
आपल्या महान भारतीय संस्कृतीने दिलेल्या सणानिमित्त "तिळगूळ घ्या गोडगोड बोला" ह्या एका वाक्याने एका दिवसाकरिता का असेना पण दोन सख्खे शेजारी जर गोड बोलू शकतात. तर विचार करण्या लायक बाब हीच आहे की, जर का तीळ भरच गोडवा आपल्या जिभेवर टिकवला तर हे आयुष्य गोड होणार नाही का...??? मनातील क्लिमिषांना आकाशभर भिरभिरणाऱ्या पतंगाप्रमाणे उडवून लावता येणार नाही का....??? ह्या साऱ्या प्रश्नांची नाही म्हणायला थोड्याफार प्रमाण हो अशीच उत्तर देता येतील. पण मनुष्याच्या अंतःकरणात अभिमान, गर्व, मीपणाचा अहंकार, स्वार्थ ह्याचसारखे कित्येक सुलेमानी किडे घर करून राहतात आणि त्या कीटकांचा उपद्रव दोन सज्जन कुटुंबियांना होत राहतो.

मी नविनवर्षात अनेक संकल्प केले असतील आणि आतापर्यंत ते मनपटलावरून साफ पुसले ही गेले असते पण ह्या पुढे मी संकल्प करतो की माझ्या व्यक्तिगत आयुष्यात येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीशी मी तोंडात गुळरूपी गोडवा घेऊन आणि मनात तिळाचा स्निग्धता ठेवून प्रत्येकाशी गोड गोड बोलेन.
आणि आशा करेन की मलाही असेच गोड गोड बोलणारे लोकं माझ्या सानिध्यात यावेत.

ह्या वर्षातली संक्रांत आपल्या आयुष्यातील कष्टप्रद दुःखद क्षणांवर येवो व आपल्या जिभेवर व चेहऱ्यावर रेंगाळणार नेहमीचा गोडवा असाच टिकून राहो ह्याच सदिच्छेसह आपणांस व आपल्या परिवारास मकरसंक्रांतीच्या मनःपूर्वक हार्दिक शुभेच्छा.....

शुभेच्छूक:-सौ.व श्री. श्रीकांत सुनंदा घरटे पाटील सुनीता पवार पाटील

Comments

Popular posts from this blog

पुस्तक