#एक_ऋणानुबंध_बापलेक

उत्तररात्रीचे व्दारपाल माघारी फिरुन गेल्यावर
गरीब महालात तेव्हा झाला होता चिवचिवाट
इवलेसे पाखरू आले होते घरात माझ्या
ही त्याच दिवसाची कथा कहाणी आहे बाळा
ज्या दिवशी माझ्यातला बाळ संपून झाला होता बाबा
तुझ्यात पाहिले मी मग त्या दिवशी तुझ्या
आई अन आजीचे गं बालपण आणि माझ्यातल्या
पुरुषाचा झाला होता खरा सत्कार तेव्हा
वाट चुकलेल्या वाटसरूस दिसू लागावी वाट
क्षणभरातल्या त्या लखलखाटाने तदवतच
माझ्याही नशिबी आली नवी नजर अन
पाऊलवाट...जेव्हा समईरुपी तू माझ्या दारी आली
झाला होता गगनात न मावणारा आनंदोउत्सव
तुझ्या ग आगमनाने बाळा.....
त्या दिवशी मी राजा झालो एका कोकरूचा
गं मी बाळा बाप झालो.....
या आनंदाच्या लहरींनवर मी कित्येक वर्षे
भराऱ्या घेतल्या कित्येकदा मला धन्य झाल्यागत वाटलं
तुला जपण्यात तुझे बोबडे बोल ऐकण्यात हा जन्म
अपुरा असल्यागत वाटलं....तू आयुष्याच्या एकेक
पायऱ्या चढत गेलीस अन मी एकेक उतरत होतो
नेमका त्याच क्षणी बाळा असा एक क्षण आला
तुझ्या विवाहाचा निरोप माझ्या कानी घेऊन आला
त्या पिवळसर नारंगी क्षणाला मी आता रोज आठवतो
सायंकाळी फाकलेल्या त्या आकाशातील रंगाला पाहतो
आठवतात मला तुझे ते बोबडे बोल अन ऐकू येतात
तुझ्या पाऊलातील सोनसाखळीचे मधुर स्वर
आयुष्याच्या सायंकाळी बेटा एकच मागतो देवाला
दे रे प्रत्येकाला तू एक छानशी परी देवा पण
कधी कधी करू नकोस रे ताटातूट एका चिमणीची
तिच्या थकलेल्या बाबापासून...जी जन्मते
माझ्या घरी पण जाताना ती सारं काही
सोडून जाते....

असं कधी नको करू.....

✍️श्रीकांत गोविंदराव घरटे पाटील

Comments

Popular posts from this blog

पुस्तक