मासिकपाळी
पुरुषसत्तेने मासिकपाळी
ठरवला हा विटाळ
सांगा आता उद्याची
कशी होईल सकाळ
स्रिया या जातिव्यवस्थेचे
आहेत प्रवेशद्वार
समाजच का टाकतो वाळीत
जेव्हा येतात ते दिन चार
धर्मसत्ते आडून पुरुषसत्तेला
स्रियांना नियंत्रित करण्याची
आहे मुभा
मग का नाही राहत पुरुष
तिच्यासोबत उभा
कधी विचारलं का कुणी
स्त्रीला नैसर्गिक लैंगिक
सुखाविषयी काय वाटते
त्या मासिकपाळीपासून
तिला नैसर्गिक सुखाची
ओढ का वाटू लागते
महिलांना आलेले चार दिन
सुखावणारे असतील का
सांगा आता तिला
एका कोपऱ्यात बहिष्कृत
करण्याचे दिन संपतील का
श्री.श्रीकांत गोविंदराव पाटील
धुळे महाराष्ट्र
९४०४४७५२८६
Comments
Post a Comment