क्षण

तुझ्या लालस गोड ओठांवर
शब्द माझे सदोदित यावेत
मी गिरवावेत सुखद क्षण
तुझ्याच नेत्रकड्यातून ते विरघळावेत
लिहावेत क्षण काही दुःखाचेही
लिहण्याच्या ह्या प्रवासातच तुझ्या
चिरतरुण आनंदाचे क्षण गवसावेत
क्षणाक्षणांनी एकत्र येऊन
आयुष्याने आकार घ्यावा
सुखी करणारा एखादा क्षण
आपल्याही जन्मी यावा...
क्षणभंगुर ह्या श्वासांच्या कहाणीचा
सत्कार व्हावा असा काही
सुगंधित व्हावा वारा अन दुमदुमाव्यात
दिशा दाही

✍️श्रीकांत गोविंदराव घरटे पाटील

Comments

Popular posts from this blog

पुस्तक